स्मिथ मैदानातून थेट रुग्णालयात   

लॉर्ड्स : जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या तिसर्‍या दिवशी एक मोठी घटना घडली. ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार आणि अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाचा झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना स्मिथच्या उजव्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीमुळे स्मिथला तातडीने मैदान सोडावं लागलं. माहितीनुसार, प्राथमिक तपासणीनंतर त्याला तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.सध्या त्याच्या दुखापतीचं स्वरूप किती गंभीर आहे, हे स्पष्ट झालेलं नाही. या प्रसंगामुळे ऑस्ट्रेलियासाठी ही एक मोठी चिंता ठरू शकते.

Related Articles